शहरात केंद्रस्तरीय (बुथ) यंत्रणा मजबूत करण्यासाठी राजदूत नियुक्तीची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शाखाध्यक्षांशी साधलेल्या संवादातून पुढे आली. एका प्रभागात साधारणत: ४० यानुसार १२०० हून अधिक राजदूत नियुक्तीची तयारी झालेली आहे. अनेक प्रभागात शाखाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळी नावे दिली. त्यावर मतैक्य घडवून याद्यांवर वरिष्ठांचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. या घोळात अडकलेली राजदूत नियुक्तीची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

हेही वाचा- मॅकेट्रॉनिक्स, आयटी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची आखणी; राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाशिक केंद्रासाठी नियोजन

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्या अंतर्गत नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी मंगळवारी राजगड कार्यालयात मध्य नाशिक आणि पंचवटीतील १४ प्रभागातील शाखा अध्यक्षांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. नंतर विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बुधवारी नाशिकरोड, सिडको आणि सातपूर विभागातील शाखाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. पहिल्या दिवशी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी अर्थात केंद्रस्तरावर काम करण्यासाठी नियुक्त करावयाचे राजदूत म्हणजे बुथप्रमुखाचा विषय चर्चेला आला. शाखाध्यक्ष आणि इच्छुकांतील असमन्वयाने ही नियुक्ती रखडली. पक्षात शाखाध्यक्ष बाजूला फेकले गेल्याची भावना आहे. त्यांना विचारात घेतले जात नसल्याचा सूर उमटल्याने अमित यांनी संबंधितांच्या नाराजीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष हा पक्षाचा कणा असल्याची संकल्पना यापूर्वीच मांडली आहे. शाखाध्यक्षांच्या कामाचा आढावा अमित यांनी घेतला. त्यांच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या.

हेही वाचा- जळगाव : सफाई कामगारांचा संप; वाॅटरग्रेस कंपनीकडून थकबाकीसह वेतनवाढीची मागणी

शहरातील जुन्या ३१ प्रभागात राजदूत नियुक्ती झालेली नाही. त्यांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष दिलीप दातीर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अमित यांच्या उपस्थितीत थेट सरपंचपदी निवडून आलेले काही पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार असल्याचे दातीर यांनी सांगितले.

हेही वाचा- खडसे पती-पत्नीच्या अडचणीत वाढ

इंजिन, आकाशकंदील…

अमित ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वातावरण निर्मितीसाठी राजगड कार्यालयाबाहेर इंजिन या पक्षचिन्हाची प्रतिकृती साकारली. कार्यालयाबाहेर मंडप टाकला गेला. भगव्या रंगातील आकाशकंदील सर्वत्र लावले गेले. काही वर्षांपूर्वी मनसेचा शहरात बोलबाला होता. महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत पक्षाने सत्ताही प्राप्त केली होती. संघटनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नंतर फाटाफूट होऊन पक्षाची बिकट अवस्था झाली. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

Story img Loader