अजित पवारांसह ९ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात झाली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या खंडोजी खोपडेंचा नाही. तर, वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी राजे देशमुख यांचा आहे, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल कोल्हे म्हणाले, “वारंवार पक्ष आणि आमदार का फोडले जात आहेत, याचा विचार केला पाहिजे. केंद्रातील सरकार सत्तेत येऊन ९ वर्ष झाली आहेत. ‘मोदी @ ९’ कार्यक्रम टिफिन बैठका सुरु आहेत. पण, ९ वर्षात महागाई कमी झाली नाही. दरवर्षी २ कोटी प्रमाणे १८ कोटी रोजगार मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव मिळाला नाही, याची केंद्रात बसलेल्या सरकारला जाणीव आहे.”

हेही वाचा : “दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ…”, अमित ठाकरेंचं विधान

“ही सगळी पाप बघितल्यावर जनता आपल्याला जागा दाखवणार याची भावना सरकारच्या मनात बळावली आहे. यानंतर मनातील शकुनीमामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला. त्यातून ही परिस्थिती उद्भवत आहे. २०१४ साली १५ लाख देतो, म्हणून सांगितलं होतं. पण, निवडणुकीनंतर ‘चुनावी जुमला’ होता, सांगण्यात आलं. त्यादिवशीपासून बोटावरील शाई ही लोकांना चुना दिसत आहे,” असा टोला अमोल कोल्हेंनी भाजपाला लगावला आहे.

“केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल येथे भाजपाची सत्ता नाही. सगळीकडून हद्दपारी सुरु आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा अशी भूमिका घेत आहे,” असा दावा अमोल कोल्हेंनी केला आहे.

हेही वाचा : “तुम्ही परत या, मी पक्ष सोडतो”, आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांच्या गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“महाराष्ट्रात एक नवीन देवस्थान सुरु झाले आहे. त्या देवस्थानाचं नाव ‘ईडी’ असं म्हणतात. त्यातून बाहेर आल्यानंतर ‘मी फक्त विकासासाठी गेलो,’ असं सांगतात. पण, महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या खंडोजी खोपडेंचा नाही. तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी राजे देशमुख यांचा आहे,” असेही अमोल कोल्हेंनी म्हटलं.