राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गणितीय बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी अबॅकस या प्राचीन तंत्राचा वापर करणे, हा नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेतील ज्योती आहिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविला. एनसीआरटी दिल्लीद्वारे आयोजित ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस अँड एक्सपेरीमेंट्स इन एज्युकेशन’ या स्पर्धेत उपशिक्षिका अहिरे यांनी सादर केलेल्या नवोपक्रम आराखड्याची निवड करण्यात आली.
हेही वाचा- जळगाव: अंधश्रद्धेपोटी मुक्या जीवांचा छळ; काळ्या घोड्यांची नाल विकणार्यावर कारवाई; दोघे पसार
संपूर्ण देशभरातून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून या एकमेव नवोपक्रमाची निवड झाली आहे. गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी हा विषय अबॅकसच्या साह्याने वेगळ्या पध्दतीने शिकवता येतो. अहिरे यांनी आपल्या वर्गातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना अबॅकस या विषयाचे अध्यापन केले.
हेही वाचा- नाशिक : अपघातग्रस्त मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा; मद्यपी चालकाविरोधात गुन्हा
अबॅकस हा विषय आपल्या ग्रामीण आदिवासी परिसरात संपूर्णतः नवीन आहे. यासाठी शिक्षकांनी स्वतः अबॅकस शिकून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचे अध्यापन केले. या नवोपक्रमाच्या पडताळणीसाठी एन सी आर टी दिल्ली येथील सदस्य लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे येथे भेट देणार आहेत.