प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी दिवाळीनिमित्त साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबा मंदिर संस्थानाला १.५ कोटी रुपयांची देणगी अर्पण केली. साई संस्थानाने याबद्दल माहिती दिली आहे.
साई बाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत याही अनंत अंबानी यांच्याबरोबर होत्या. एक तास अनंत अंबानी मंदिरात होते. त्यांनी साईबाबांची मध्यान्ह आरतीही केली. त्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनंत अंबानी यांनी दीड कोटी रुपयांच्या देणगीचा चेक सुपूर्द केला, असे मंदिर ट्रस्टच्या एका प्रवक्त्याने सांगितलं.
हेही वाचा : “नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…”, एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर!
या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थान भक्तांसाठी लोकउपयोगी काम करेल. करोना काळात ऑक्सिजन प्लांट आणि आरटी-पीसीआर लॅब उभारणीसाठी अंबानी यांनी साईबाबा संस्थानाला मदत केली होती, असेही ट्रस्टच्या प्रवक्त्याने म्हटलं.