नाशिक – शिवसेनेतील खासदार, आमदार आणि इतर नेते बदलले, पण शिवसैनिक बदललेला नाही. खोक्यांचा मोह नेत्यांना आहे, शिवसैनिकांना नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडले. पक्षाचे नाव, चिन्ह गेले तरी ठाकरे यांच्या नावावर शिवसेना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली खरी शिवसेना टिकली तरच मराठी माणूस टिकेल. शिवसैनिकांनी गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेतर्फे शिवगर्जना अभियान हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत रविवारी सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे यांच्या विभागनिहाय जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा पाच मार्च रोजी कोकणात होणार असून, दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र विभागाची सभा होईल. उत्तर महाराष्ट्रातील संघटना बांधणीची जबाबदारी पक्षाने माजीमंत्री गीते, आ. विजय औटी, उपनेत्या संजना घाडी, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर सोपविली आहे. त्यांच्यामार्फत लोकसभा मतदारसंघनिहाय शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. या नेत्यांच्या दौऱ्याला नाशिकपासून सुरुवात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गीते यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रायगड येथील पहिल्या सभेनंतर अलीबाबा आणि ४० चोर नामशेष होणार असल्याचा दावा केला. पक्षांतरामुळे नाशिकमध्ये कमकुवत झाल्याचे चित्र समाजमाध्यमातून रंगविले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. मेळाव्यातील गर्दीचा दाखला देत नाशिककर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे गीते यांनी नमूद केले. शिवसेनेकडे काही नव्हते तेव्हाही शिवसेना लढत होती. आताही लढून विजय मिळवू, असा विश्वास त्यांंनी व्यक्त केला. खा. संजय राऊत यांच्याकडून विरोधकांना कडवटपणे दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराचे त्यांनी समर्थन केले.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
fraud with senior citizen, pretending army officer,
लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या

हेही वाचा – जगभरात कांद्याची टंचाई, महाराष्ट्रात रस्त्यावर फेकण्याची वेळ! राज्यात दीड महिन्यात प्रति क्विंटल ८०० रुपयांची घसरण

हेही वाचा – नाशिक : विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

शिवसैनिकांचे मनोबल उंचावून संघटनेची नव्याने बांधणी केली जाणार असल्याचे आमदार औटी यांनी सांगितले. काल काय व्हायचे ते होऊन गेले. आज शिवसैनिक एकत्र असून उद्या काय होणार हे सर्वांना ज्ञात असल्याचे नमूद केले. निवडणूक आल्यानंतर मराठी माणूस विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल. मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये काही संभ्रम असेल तर तो दूर करण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह दत्ता गायकवाड, वसंत गीते, सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.

Story img Loader