नाशिक : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सदनिका खरेदी-विक्री व्यवहारात महिलेची १८ लाखहून अधिक रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत नंदिनी उफाडे (आनंदनगर, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली. नरेश कारडा (नाशिक रोड) व प्रविण जगताप (सरस्वतीनगर, पंचक, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. उफाडे यांनी १६ मार्च रोजी कारडा कन्स्ट्रक्शनच्या देवळाली शिवारातील हरीओमनगर येथील हरिकृष्ण प्रकल्पातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकाचा कारडा यांच्याशी व्यवहार केला होता. या सदनिकेसाठी उफाडे यांनी वित्त संस्थेकडून कर्ज घेऊन १८ लाख ३८ हजार ९६३ रुपये कारडा यांना दिले होते. वित्तीय संस्थेचे कर्ज असताना कारडा यांनी मुदतीत बांधकाम पूर्ण करून ताबा न दिल्याने उफाडे यांची फसवणूक झाली.

हेही वाचा… जायकवाडीला पाणी देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, मेंढेगिरी समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी

वित्तीय संस्थेने सदनिका लिलावात काढल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. कारडा कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात तक्रारींचा ओघ सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच चार कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पुर्वी बांधकाम प्रकल्पात दोन गाळ्यांसाठी नोंदणीकरिता एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम स्वीकारून हे काम पूर्ण न करता आणि ग्राहकास रक्कम परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another police case filed against construction businessman naresh karda in nashik asj