लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. जल-जंगल-जमीन यावर आदिवासी समाजाचा अधिकार आहे. सध्या आदिवासी समाजाला सांभाळण्याची आणि जागृत करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. युवा पिढीने प्रक्षोभक वक्तव्यांना बळी न पडता आदिवासी धर्म वाचवावा, अन्यथा त्यांचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी दिला.

Ramdas athawale, Dahanu,
महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची गरज काय – रामदास आठवले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Finance department, Gulabrao Patil,
अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Nagpur, Maharashtra, Contractual Electricity Worker Contractual Electricity Worker's Union protest, Maharashtra Electricity Contract Workers Union,
रा. स्व. संघाशी संबंधित कंत्राटी कामगार संघटनेचा नागपुरात ठिय्या….मागण्या पूर्ण होईस्तोवर….
Sharad Pawar, Sharad Pawar on Educational Expansion in Maharashtra, pune
राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Free electricity, farmers, mahavitaran,
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..

येथे पेठरोडवरील एकलव्य निवासी शाळेत नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात आर्या यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संशोधन अधिकारी अंकितकुमार सेन, वरिष्ठ अन्वेक्षक गोवर्धन मुंडे, सल्लागार अमृतलाल प्रजापती, खासगी सचिव प्रकाश उईके, अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

आदिवासींच्या चालीरीती, परंपरा आणि संस्कृती भिन्न आहेत. प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात तसेच घरी आदिवासी बोलीभाषेचा वापर करण्याचे आवाहन आर्या यांनी केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, चांगल्या समाजात वावरावे, अशी सूचनाही त्यांनी केली. शिक्षणातूनच उत्तम जीवन घडते. युवा पिढी भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकल्याचे बोलले जाते. त्यामुळे युवकांनी भ्रमणध्वनीपासून दूर राहण्याची गरज त्यांनी मांडली. कार्यक्रमात वनहक्क दावे, घरकुल, कंत्राटी व पेसाभरती, शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, वसतिगृह, डीबीटी आदी विषयांवर मंथन झाले. आर्या यांनी शंकांचे निराकरण केले.

आणखी वाचा-नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन

वनदाव्यांसाठी समिती

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समिती केली जाणार आहे. त्यात उपवनसंरक्षक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, आयोगाचा सदस्य, आदिवासी समाजातील एक व्यक्ती आदींचा समावेश असणार आहे. ही समिती वैयक्तिक तसेच सामूहिक वनपट्टे लाभार्थ्यांना देणार आहे. वनपट्टेधारकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून लाभ मिळणार असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी सांगितले.