मालेगावात दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी भल्या पहाटे केलेल्या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चा येथील म्होरक्या सैफु रहेमान यास ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवाद कृत्यांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यात सैफु याचे नाव पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा- नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणात ६० टक्के पदे रिक्त; आपत्कालीन स्थिती हाताळताना अभियंत्यांची दमछाक

आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके जप्त

या छापेमारीबद्दल अत्यंत गोपनीयता पाळली जात असली तरी सैफु यास ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. सैफु हा ‘पीएफआय’ या धार्मिक संघटनेचा नाशिक जिल्हा प्रमुख असून या संघटनेचा राज्य पदाधिकारी म्हणूनही तो जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील हुडको कॉलनी भागात सैफु हा वास्तव्यास आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यात काही आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader