लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: स्थानिक केंद्र (बूथ) पातळी भक्कम करण्यासाठी नियोजनबध्दरित्या काम करण्याचा मंत्र येथे आयोजित युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक आणि समाज माध्यम प्रसिध्दी प्रशिक्षण वर्गात देण्यात आला.

युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश समाज माध्यम प्रभारी झीनत शबरीन, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड आकाश छाजेड, नगरसेवक राहुल दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा आणि जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मितेंद्र सिंग यांनी मार्गदर्शन केले, कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी दिवसरात्र एक करण्याचे आवाहन त्यांनी केले. शबरीन, दिवे, ओगले आणि छाजेड यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Story img Loader