लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्या परिषदेवर कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नाम निर्देशन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्या परिषदेसाठी कुलपतींकडून नामनिर्देशन करण्यात येते. या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेवर पुण्याचे डॉ. नरेंद्र पटवर्धन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-“देवेंद्र फडणवीस भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
राज्याच्या प्रशासकीय विभागानुसार नागपूर विभागातून डॉ. मनिषा कोठेकर, मराठवाडा विभागातून औरंगाबादचे डॉ. विलास वांगिकर, पश्चिम महाराष्ट्र विभागातून साताऱ्याचे डॉ. मनिष इनामदार, कोकण विभागातून डॉ. वर्षा फडके यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. विद्या परिषदेवर मुंबईच्या डॉ. नीलिमा क्षीरसागर, मुंबईचे डॉ. श्रीराम सावरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी दिली.