नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२३ च्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांना राज्यातील ३३ केंद्रांवर सुरुवात झाली आहे.पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा २६ जूनपर्यंत सुरु राहणार आहेत.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणेबाबत सर्व परीक्षा केंद्रप्रमुख व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. याबाबतीत अडचणी किंवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा अथवा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ०२५३-२५३९२५१ क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader