जळगाव: पावसामुळे अमळनेर येथील बोरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील रहिवाशांत भीती निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील बिलखडे, फापोरे खुर्द, सात्री, कन्हेरे, तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेर शहराशी संपर्क तुटला. कायम कोरडी राहणार्‍या बोरी नदीचा पूर पाहण्यासाठी अमळनेकरांनी गर्दी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारोळा तालुक्यातील पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे तामसवाडी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे बोरी नदीला पुराचे स्वरूप आले आहे. एरवी कोरडी ठणठणात राहणाऱ्या बोरी नदीला गुरुवारी झालेल्या पावसामुळे मध्यरात्रीनंतर अचानक पूर आला. त्यामुळे भिलाली येथील पूल पाण्याखाली गेला.

हेही वाचा… धुळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना; जिल्हाधिकाऱ्यांकडून तलावांची पाहणी

कन्हेरे पुलावरून दीड-दोन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. शुक्रवारी सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता. पुरामुळे शिक्षक सातेरी जिल्हा परिषद शाळेत पोहोचू शकले नाहीत. परिसरातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अमळनेर येथील शाळा-महाविद्यालयांत शिक्षणासाठी जातात. पुरामुळे तेही अमळनेरला जाऊ शकले नाहीत. यासंदर्भात प्रकल्पांतील पाणी सोडण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणताही पूर्वसूचना देण्यात न आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As bori river in amalner taluka was flooded many villages lost contact dvr