नाशिक: राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा भ्रमणध्वनीव्दारे धमकी देण्यात आल्याने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयिताच्या तपासासाठी पथक परभणी येथे रवाना झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हॉटसअ‍ॅपव्दारे धमकी देण्यात आली. तुम्ही नीट रहा, नाहीतर तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणातून धमकी परभणीतून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

हेही वाचा… यावलमध्ये अवैध खरेदी-विक्री करणारे १४ संशयित पोलिसांच्या जाळ्यात

संशयिताचे धागेदोरे मिळाले असून भ्रमणध्वनी क्रमांक त्याचा की अन्य कोणाचा तसेच अन्य माहितीसाठी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी अंबड पोलिसांचे पथक परभणीकडे रवाना झाले आहे.