लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: प्रलंबित मागण्यांसाठी आयटक संलग्न आशा व गटप्रर्वतक संघटनेतर्फे येथे मोर्चा काढण्यात आला. सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी अशा शिक्षण झालेल्या आशा स्वंयसेविकांना इंग्रजी सफाईदारपणे वाचता येत नाही. असे असतानाही त्यांना ऑनलाईन माहिती भरणे, अॅपमध्ये काम करण्याची सक्ती केली जात आहे. त्यांना ७२ शीर्षाखाली कार्यक्षेत्रातील जनतेला सेवा पुरवावी लागते.

आणखी वाचा-नाशिक: रावण दहन कार्यक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल

अतिदुर्गम भागात भ्रमणध्वनीशी संपर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन कामात आशा स्वयंसेविकाचा वेळ जातो. त्याचा परिणाम कामावर होवून कमी मोबदला मिळाल्याने मोठे नुकसान होते. ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकूनही आशा स्वयंसेविकांना कामाची सक्ती केली जात आहे. अशी सक्ती रद्द करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha group promoters march in dhule mrj