राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार असल्याने त्यांनी राज्यपालपद सोडून ते ज्या पक्षातून आले त्यात जाण्याची गरज विधीतज्ज्ञ असिमकुमार सरोदे यांनी मांडली. राज्यपाल राजकीय पक्ष आणि पक्षाचे विचार बाजूला ठेवू शकलेले नाहीत. ते एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणूनच वागत असल्याने सातत्याने घटनाबाह्य वागत असल्याची टीकाही सरोदे यांनी केली.

हेही वाचा >>> अजित पवार यांचे वक्तव्य समाज गढूळ करणारे’; चित्रा वाघ यांची टीका

खासगी कामानिमित्त सोमवारी येथील न्यायालयात आलेल्या ॲड. सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापुरुषांचा अपमान असो अथवा स्त्रियांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा आणि त्यात शिक्षेचे प्रावधान झाल्याखेरीज अशा लोकांच्या वागणुकीत परिवर्तन होणार नाही. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात पाचऐवजी सात न्यायाधीशांचे घटनापीठ असले पाहिजे, भारतीय संविधनाच्या परिशिष्ठ दोन अ नुसार पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना अपात्र धरले जाऊ शकते. शिंदे सरकारने पक्षविरोधी कारवाया केल्या असुन त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. तसे झाल्यास काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यतादेखील ॲड. सरोदे यांनी व्यक्त केली.  महाराष्ट्रातील सर्व उच्च न्यायालयांचे कामकाज आता तरी ऑनलाइन पद्धतीने झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader