नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने सोमवारी इच्छुकांची उमेदवारीसाठी एकच धावपळ सुरू होती. महाविकास आघाडीत जागा आणि उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब न झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. काहींनी अखेरच्या क्षणी मिळेल त्या पक्षातून अथवा अपक्षही मैदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाशिक मध्य मतदारसंंघातील माजी नगरसेवकांना घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबईत धडक दिली. चांदवड-देवळा मतदारसंघात भावासाठी माघार घेऊनही डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने ते बंधू केदा आहेर यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले. महाविकास आघाडीतील काही इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. नांदगावची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) सोडावी आणि माजी खासदार समीर भुजबळांना उमेदवारी द्यावी, यासाठी नांदगावमधील पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाने सायंकाळपर्यंत उमेदवारही जाहीर केले नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. भाजपनेही नाशिक मध्यच्या जागेवर नाव निश्चित केलेले नाही विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. त्यांचा भ्रमनिरास झाल्याने सोमवारी सकाळी त्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना घेऊन मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या. शिवसेना शिंदे गट अखेरच्या क्षणापर्यंत ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. चांदवड मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ, राहुल आहेर यांनी कौटुंबिक कलह टाळण्यासाठी उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर केले होते. पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिल्याने कौटुंबिक कलह वाढण्याची चिन्हे आहेत. डॉ. राहुल आहेर आणि केदा आहेर या दोघांनी चांदवडच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी मुंबईला धाव घेतली.

Maharashtra BJP candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 in Marathi
Maharashtra BJP Candidate List 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, कुणाला संधी?
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Loksatta chavdi
चावडी: उद्घाटन मध्यरात्री २ वाजता!
Mahavikas Aghadi Panvel, Panvel candidature,
पनवेलच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच, शिरीष घरत, बाळाराम पाटील, लीना गरड उमेदवारीसाठी इच्छुक
sambhajinagar sarees sale
विधानसभा निवडणुकीपूर्वी साड्यांच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ, लाडकी बहीण व घाऊक साडी वाटपामुळे विक्री तेजीत
Wardha, interview Congress candidates,
काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी
Marathwada, Congress, Muslim candidate,
मराठवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये गर्दी वाढली, शहरात मुस्लिम उमेदवाराचा शोध; जालन्यात हमरीतुमरी, राडा
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !

हेही वाचा…नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी ?

महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. शिंदे गटाच्या ताब्यातील नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावा, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले. या मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रही धरला गेला. महाविकास आघाडीत शहरातील मतदारसंघांवर तीनही पक्षांनी दावा सांगितल्याने कोणती जागा कोणाला मिळते याकडे इच्छुकांचे लक्ष आहे. नाशिक पूर्वच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही आहे. या जागेवर भाजपचे स्थायी सभापती गणेश गिते यांचे पक्षांतर अवलंबून आहे नाशिक मध्यवरून काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटात वाद सुरू आहेत. वरिष्ठांच्या कार्यपदध्दतीने तीनही पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. इगतपुरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी तिकीटासाठी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी ठेवली होती. जागा वाटपाला अंतिम स्वरुप मिळत नसल्याने असे अनेक इच्छुक निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.