नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने सोमवारी इच्छुकांची उमेदवारीसाठी एकच धावपळ सुरू होती. महाविकास आघाडीत जागा आणि उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब न झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. काहींनी अखेरच्या क्षणी मिळेल त्या पक्षातून अथवा अपक्षही मैदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाशिक मध्य मतदारसंंघातील माजी नगरसेवकांना घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबईत धडक दिली. चांदवड-देवळा मतदारसंघात भावासाठी माघार घेऊनही डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने ते बंधू केदा आहेर यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले. महाविकास आघाडीतील काही इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. नांदगावची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) सोडावी आणि माजी खासदार समीर भुजबळांना उमेदवारी द्यावी, यासाठी नांदगावमधील पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा