नाशिक : देवळाली कॅम्प येथे टीए बटालियन यांच्या वतीने सैन्य भरती प्रक्रिया सुरु असून सोमवारी राज्यातील अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सोलापूर, सांगली आणि सातारा येथील सुमारे १२ हजारांहून अधिक तरुणांना संधी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो तरुण देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून उपस्थित झाले होते. काहींची निवड झाली. तसेच अनेकांना या निवड प्रक्रियेत होणाऱ्या विविध चाचण्या पार करता न आल्याने सुमारे ९५ टक्के तरुणांच्या पदरी निराशा पडली. मोठ्या प्रमाणात तरुणाई दाखल झाल्याने बटालियनकडून भल्या पहाटे दोन वाजेपासून प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. थंडीमध्ये कुडकुडत सर्वजण चार रांगेत बसले.

हे ही वाचा… गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

हे ही वाचा… नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

आनंद रोडपासून बसलेल्या तरुणांची रांग थेट लामरोडवरील महाराज बिरमणी यांच्या बंगल्यापर्यंत पोहचली होती. मंगळवारी मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया होईल. भरती प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी ११६ टीए पॅरा बटालियनचे अधिकारी आणि जवान प्रयत्नशील आहेत.