नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे.

Nashik Bus Accident : “जळालेल्या अवस्थेत प्रवासी सैरभैर पळत होते, अनेकांचा तर रस्त्यावरच कोळसा झाला; आम्ही हतबल होतो, कारण…”

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

Nashik Bus Accident : मुख्यमंत्री शिंदेंनी मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर केली ५ लाख रुपयांची मदत

या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली.

याशिवाय बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजल्याने , त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे.

आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले –

यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती. सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. १३ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

बसमधील प्रवाशांची यादी –

बसमधील प्रवाशांच्या माहिती साठा संपर्क साधा –

आज पहाटे नाशिक शहरामध्ये ट्रेलर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी व मृत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत . +912532572038 ,+912532576106 अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे