धुळे : काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील (८४) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलेग, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील देवपूर भागात असलेल्या नेहरू हौसिंग सोसायटी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.. एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी सकाळी सात ते १० या वेळेत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कृषी, महसूल, पाटबंधारे विभागाची मंत्रिपदे सांभाळली.

हे ही वाचा…नाशिक : लाच स्वीकारताना तलाठीस अटक

धुळे तालुक्यातील तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. विशाल खान्देशचे नेते अशी त्यांची ओळख होती. काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव कायम घेतले जात असे. दाजी म्हणून लोकप्रिय असलेले रोहिदास पाटील हे काँग्रेसशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. लोकसभा निवडणुकीआधी खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेप्रसंगी ते धुळ्यात आले असता त्यांनी आवर्जुन आजारी असलेले रोहिदास पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत इंदिरा गांधी यांच्याबरोबरच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the age of 84 former congress minister rohidas patil passed away on friday morning sud 02