लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: पिंपळगाव बसवंत येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून सिन्नर परिसरात एटीएम फोडल्याची कबुलीही त्याने दिली.

Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
chhattisgarh police managed to kill 9 Naxalites
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार
Coconut expensive due to Wayanad landslides Mumbai news
वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
nar par girna link Project marathi news
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन
Chief Minister Eknath Shindena High Court notice regarding encroachment of Nagpur Nagpur
नागपूरच्या अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना उच्च न्यायालयाची नोटीस…
Gujarat ships stuck at devgad
सावंतवाडी: हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे गुजरातच्या १०० नौका देवगड बंदरात

पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्टमध्ये चिंचखेड चौफुली परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात आले होते. एटीएमचे शटर अर्धवट उघडून यंत्र गॅस कटरच्या मदतीने कापत २८ लाख ३५ हजार ४०० रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत तपासाविषयी सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, निरीक्षक सुनील पाटील यांनी एटीएम चोरीत गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हा करतांना वापरण्यात आलेल्या वाहनांचा तपास करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तपास पथके रवाना केली होती. राज्यातील विविध शहरात एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित केली.

आणखी वाचा-जळगावात डेंग्यूने तरुणाचा मृत्यू; तीन मुले बाधित

हरियाणा राज्यातील काही गुन्हेगार हे राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नाशिक आणि अहमदनगर येथील सीमावर्ती भागात सापळा रचत एटीएम चोरीतील सराईत गुन्हेगार इरशाद खान (३८, रा. हरियाणा) याला ताब्यात घेतले. त्याने पिंपळगाव येथे साथीदारांसह एटीएम फोडल्याची कबुली दिली.

इरशादने गुन्ह्यात एक सफेद रंगाची कार आणि एक मालवाहतूक वाहनाचा वापर केला होता. हरियाणातून वाहने भाड्याने ठरवित विविध राज्यातील बनावट नंबरपट्टी वाहनांवर लावून त्यातून एटीएम फोडण्यासाठी गॅस कटर, सिलिंडर सोबत घेऊन जात असे. महामार्गाजवळील एटीएम केंद्रांची गुगल नकाशाद्वारे अगोदर माहिती काढून, नंतर पाहणी करुन ते केंद्र फोडत असल्याची माहिती इरशादने दिली. इरशादने यापूर्वी अहमदनगर, लातूर, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातही एटीएम चोरी आणि जनावर चोरी केली आहे. सिन्नर शहरात ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरल्याची कबुलीही त्याने दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस पथकाने केलेल्या तपासाबद्दल अधीक्षक उमाप यांनी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.