जळगाव – जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ल्याची प्रकरणे वाढत आहेत. एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असताना थेट निवासी उपजिल्हाधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. वाळूच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जळगाव निवासी उपजिल्हाधिकार्‍यांसह तहसीलदारांवर वाळूमाफियांनी गजाने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेचा पाच तालुक्यात संथपणा – मार्चअखेर कामे पूर्ण करण्याची तंबी

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्यासह अन्य दोघे शासकीय वाहनाने रात्री भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाच्या जागा पाहणी करण्यासाठी गेले होते. परत जळगावकडे येत असताना तरसोद फाटा ते नशिराबाददरम्यान पावणेबाराच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील महिंद्रा शोरूमनजीक वाळूचे दोन डंपर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्यांनी तहसीलदार बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्यास सांगितले. याअनुषंगाने डंपर ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असतानाच तेथे दुसरे डंपर आले. थोड्याच वेळात दुचाकी व मोटारीतून काही वाळूमाफिया आले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांच्या टोळक्याने कासार यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा >>> नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी

यात त्यांच्या डोक्यावर गज मारल्याने डोक्याला मार लागला असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांच्या शासकीय वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. घटनेनंतर वाळूमाफियांनी लगेच पलायन केले. जखमी कासार यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासार हे घटनेचे चित्रीकरण करीत असताना हल्लेखोरांनी भ्रमणध्वनी संच हिसकावून घेत फोडला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.सी.व्ही. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह नशिराबाद येथील सहायक निरीक्षक रामेश्‍वर मोताळे, एमआयडीसी ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. त्यांनी कासार यांची विचारपूस केली. तातडीने पोलीस पथक हल्लेखोरांच्या शोधासाठी रात्रीच रवाना झाले. पथकाने काही तासांतच गौतम पानपाटील (३९, रा. सावखेडा बुद्रुक), विठ्ठल पाटील (३८, रा. जळगाव) यांना अटक केली. याप्रकरणी नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.