लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत ठरावात मंजूर झालेले काम चालू असताना ते बंद करण्यास आणि सरपंच पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने सरपंचावर तलवारीने हल्ला चढविण्यात आला. याप्रकरणी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करून थाळनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संदर्भात धुळे जिल्ह्यातील जैतपूरचे सरपंच भोजेसिंग राजपूत (६५) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सरपंच राजपूत यांनी ग्रामपंचायत ठरावात मंजूर केलेली कामे बंद करावीत आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव होता. राजपूत यांचा या दोन्ही गोष्टी करण्यास नकार होता. त्यामुळे पितांबर घोडसे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने सरपंच राजपूत यांच्यावर तलवारीने हल्ला केला.

आणखी वाचा-जळगावची मेहरुणची बोरे यंदा कमी, पावसाचा हंगामावर परिणाम

जैतपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर सकाळी झालेल्या या हल्ल्यात राजपूत यांच्या पोटावर व हातावर तलवारीचे वार झाल्याने जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर जैतपूर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील राजकारण कसे वळण घेत असते, ते उघड झाले आहे. या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात पितांबर घोडसेविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घोडसे यास अटक केली आहे. सरपंचावर हल्ला करण्याच्या या प्रकाराची दखल तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attacked on sarpanch with sword in dhule district anger for not resigning from the post mrj
Show comments