धुळे: शिंदखेडा तालुक्यातील विखरण गावातील औष्णिक विद्युत प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा तातडीने योग्य मोबदला मिळावा आणि बनावट कागदपत्रांच्याआधारे मोबदला मिळविणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी येथे आंदोलन केले. एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच अडविल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनात विखरण (देवाचे) येथील शेतकरी जयसिंह गिरासे यांच्यासह प्रवीण पाटील, दगेसिंह गिरासे, विजयसिंह गिरासे, रवींद्र दाभाडे, पांडूरंग पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते. 

हेही वाचा >>> धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला…; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> जिल्ह्यात गोवर नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहीम;  मालेगावकडे विशेष लक्ष

यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. विखरण येथील शेतजमीन २०१२ या वर्षी औष्णिक विद्युत प्रकल्प अंतर्गत संपादित करण्यात आली. परंतु, काही शेतकऱ्यांकडे फळबाग नसतानाही त्यांनी दलालामार्फत खोटी कागदपत्रे व खोटा पंचनामा करुन कोट्यवधींचा मोबदला मिळवला. परंतु, ज्यांची खरोबर फळबाग आहे, अशा शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यापैकी जयसिंग गिरासे या शेतकऱ्याने पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन गिरासेंच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेत त्यांना रोखले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन निर्यात देण्याचे आश्वासन दिले

Story img Loader