लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: सिडको पाठोपाठ नाशिकरोड भागात सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमिवर, शहरातील भाजपच्या आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मांडली. गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतली असून पुढील काही दिवसांत बदल दिसतील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचा दावा आमदारांनी केला आहे. या प्रश्नावर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चर्चेची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदारांना उशिरा का होईना, जाग आली असताना दुसरीकडे सत्तेत पुन्हा सहभागी झालेले आणि विरोधात असताना गुन्हेगारीविरोधात आवाज उठविणारे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी अद्याप जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे दादा भुसे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे निर्देश देत पालकत्व निभावण्याची धडपड चालविली आहे.

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Nashik Municipal Commissioner Manisha Khatri directed pwd to fix potholes immediately
नाशिक खड्डेमुक्त करण्याची सूचना; मनपा आयुक्तांनी खडसावले
nashik two school children died in accident
नाशिक : मालमोटारीखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, अल्पवयीन मुलाकडे दुचाकी देणे जिवावर बेतले
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
12 Crore worth of valuables seized, rural police,
नाशिक : वर्षभरात ग्रामीण पोलिसांकडून १२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, अवैध व्यवसायांविरोधात सहा हजारपेक्षा अधिक कारवाया

शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा रंगणारा खेळ आता सारेच लोकप्रतिनिधी सत्तेत सहभागी झाल्यामुळे संपुष्टात आला आहे. मागील काही दिवसांत सिडको, विहितगाव आणि नाशिकरोडच्या दत्त मंदिर रस्त्यावर टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. खून, मारहाण व तत्सम गुन्ह्यांत वाढ होत आहे. उपरोक्त गुन्ह्यात पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत संशयित आरोपींना जेरबंद केले. शहरवासीयांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी या प्रकरणातील संशयितांची धिंड काढली. शहरात भाजपचे तीन आमदार असून देवळाली-नाशिकरोड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कथन केली. त्याची कल्पना आपणास असून पुढील दहा दिवसात बदल दिसतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे फरांदे यांनी सांगितले. या विषयावर अधिवेशनात चर्चा व्हावी म्हणून आपण लक्षवेधी दाखल केल्याचे हिरे यांनी सांगितले.

आणखी वाचा-गेले कासवाला पकडायला आणि गमावला जीव… विहिरीत गुदमरल्याने दोन शेतमजुरांचा मृत्यू

नाशिकचे पालकमंत्रिपद सध्या शिवसेनेकडे आहे. विरोधी पक्षात असताना गुन्हेगारी रोखायला हवी. पोलिसांना कोण रोखतंय, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित करायचे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मात्र यासंदर्भात कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नसली तरी विधीमंडळात भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना भ्रमणध्वनीतील वाहन तोडफोडीची चित्रे दाखवून परिस्थिती त्यांच्या नजरेस आणून दिली आहे. देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेही गप्प आहेत. याबाबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही त्या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांच्या कार्यालयाने विहितगाव व नाशिकरोडमधील घटनांबाबत सरोज अहिरे या स्थानिक पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रारंभापासून गुन्हेगारांची हयगय केली जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता मांडली. पालकमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-युवा पर्यटन मंडळ उपक्रमात चारच शाळा; नाशिक विभागात सहभाग वाढविण्याचे आव्हान

सीसीटीव्हीसाठी निधीची मागणी

गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी देवळाली मतदार संघात शहरातील जो भाग समाविष्ट होतो, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यासाठी एक कोटींचा निधी देण्याची मागणी आमदार सरोज अहिरे यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे. मनपा हद्दीत प्रभाग १९ आणि २२ चा पूर्ण भाग आणि प्रभाग २७ आणि ३१ चा काही भाग समाविष्ट होतो. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी अहिरे यांनी केल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader