नाशिक – ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार मनोहर शहाणे (९६) यांचे सोमवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. शहाणे यांनी दै. गांवकरीचे प्रकाशन असलेल्या अमृत अंकाचे संपादक म्हणून काम पाहिले होते. माध्यम विश्वात रममान होत असताना धाकटे आकाश, झाकोळ, देवाचा शब्द, पुत्र, ससे अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धुळे जिल्ह्यातील सात जणांना जन्मठेपेचे कारण काय ?

शहाण्यांच्या गोष्टी, अनित्य, ब्रह्मडोह, उद्या हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय नाटक, एकांकिका संग्रह प्रकाशित आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी मानवी मनाचे कंगोरे, मध्यमवर्गीय जगणे यांचा अचूक वेध घेतला. मराठी साहित्य विश्वाच्या साठोत्तरी साहित्य चळवळीतील ते महत्वाचे लेखक होते. नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतराचे चित्र त्यांच्या कादंबऱ्यातून आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.