लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: वन्यजीव संरक्षण संस्था आणि जळगाव वनविभाग यांच्यातर्फे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रम होत असून, त्याअंतर्गत काढण्यात आलेल्या व्याघ्रसंवर्धन जनजागृती फेरीचा समारोप शनिवारी डोलारखेडा येथे झाला. फेरीद्वारे दीडशे व्याघ्रदूतांकडून ठिकठिकाणी व्याघ्रसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
शहरातील लांडोरखोरी वनोद्यानात व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी अर्पित चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक ए. प्रवीण, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, वनक्षेत्रपाल नितीन बोरकर, निमंत्रक बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, आरोग्यदूत अरविंद देशमुख, लघुउद्योग भारतीच्या पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राजेंद्र नन्नवरे आणि राहुल सोनवणे यांनी मुक्ताई भवानी अभयारण्याबद्दल आणि तेथील जैवविविधतेबद्दल माहिती दिली.
आणखी वाचा-जामनेरजवळ बस-मालमोटार अपघातात सहा प्रवासी जखमी
जनजागृती फेरीत नाशिक, नंदुरबार, वाशिम, ठाणे, मुंबई, अकोला येथील व्याघ्रदूत सहभागी होते. भुसावळ येथील सेंट अलायसिस स्कूल आणि महाराणा प्रताप विद्यालयात पथनाट्य सादर करण्यात आले. चारठाणामार्गे निमखेडी, महालखेडा, नांदवेल, डोलारखेडा, वायला व परिसरातील गावांत व्याघ्रसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांना वह्यावाटपही करण्यात आले. दिशा बहुद्देशीय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या पथकाचे पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. डोलारखेडा येथे फेरीचा समारोप झाला.