तालुक्यातील बाभूळगाव येथील एसएनडी तंत्रनिकेतनमध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आपत्कालीन ‘डायल १०८’ या रुग्णवाहिकेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

शासन व बीव्हीपी इंडिया यांच्या वतीने ही रुग्णवाहिका चालविली जात आहे. या रुग्णवाहिकेसाठी केव्हा कॉल करावा, रुग्णाला याद्वारे कोणत्या अत्यावश्यक सेवा मिळू शकतात, जवळच्या रुग्णवाहिकेला कसा कॉल करावा, याची माहिती १०८ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलकुमार कुलथे यांनी दिली.

१०८ ला कॉल करण्यास कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही हे स्पष्ट करत रुग्णवाहिकेचे फायदे सविस्तरपणे समजाविण्यात आले.

ही माहिती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतरांनाही मिळू शकेल, असा आशावाद प्राचार्य अनंत जोशी यांनी व्यक्त केला.

Story img Loader