लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून लोकहितवादी मंडळ या संस्थेच्या आवर्तन या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच भडक दरवाजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ऐश्वर्या ब्युटी पार्लर या नाटकास द्वितीय तर, अर्थनिता फाउंडेशनच्या सेलिब्रिटी या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली. या तीनही नाटकांची स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
आणखी वाचा-नाशिक मनपा कामकाजात सुधारणांसाठी ई-कार्यालय; आयुक्तांचा संकल्प
येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात २८ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक -आर्या हिरे (ऐश्वर्या ब्युटी पार्लर), आनंद कुलकर्णी (आवर्तन), प्रकाश योजना -सागर पाटील (आवर्तन), विनोद राठोड (सशक्त), नेपथ्य- शैलेंद्र गौतम (विनाशकाले), वरूण भोईर (ऐश्वर्या ब्युटी पार्लर), रंगभूषा- माणिक कानडे (ऐश्वर्या ब्युटीपार्लर आणि आवर्तन), अभिनयसाठी रौप्य पदक – राहुल गवांदे, रीया राज, आर्या प्रशांत, दर्शना कर्हु, वेदिका अंभोरे, अपूर्व इंगळे, मिलिंद कुलकर्णी, सचिन रहाणे, अभिषेक गायकवाड , भरत कुलकर्णी यांना जाहीर झाले आहेत.