त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन; अशोक पत्की, श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना संस्कृती वैभव पुरस्कार

प्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके, लेखक पु. ल. देशपांडे तसेच कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील संस्कृती वैभवच्या वतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातून बाबूजी, गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. यानिमित्त संस्कृती वैभव पुरस्काराने ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Neelam Kothari admits she wanted to kill Chunky Panday
“त्याचा जीव घ्यावासा वाटत होता”, शूटिंगदरम्यान चंकी पांडेच्या ‘त्या’ कृतीवर भडकलेली नीलम कोठारी; म्हणाली, “तो मला…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
zee marathi awards akshara and adhipati energetic dance on joru ka ghulam
Video : “मैं जोरू का गुलाम…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर अक्षरा-अधिपतीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “विषय हार्ड…”
sangli district assembly election
सांगली जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना; मिरज, खानापूरमध्ये जागेवरून तर सांगलीत उमेदवारीवरून वाद
Vidya balan and madhuri dixit
‘भूल भुलैया ३’मधील गाण्यावर डान्स करताना विद्या बालनचा तोल गेला अन्…, पुढे तिने जे केलं ते पाहून नेटकरी करतायत कौतुक
Aabhalmaya
२५ वर्षांनी एकाच मंचावर आले ‘आभाळमाया’चे कलाकार, सर्वांना पाहून भारावले प्रेक्षक; कमेंट करत म्हणाले, “आम्ही नशीबवान…”
genelia and riteish deshmukh dances on tambdi chamdi
तांबडी चामडी चमकते उन्हात…; जिनिलीया अन् रितेश देशमुखचा मित्रमंडळींसह जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Mahavikas aghadi Seat Sharing Formula
MVA Seat Sharing : मविआचं ठरलं! कोणी मोठा व लहान भाऊ नाही, सर्वांनाच सम-समान जागा

महोत्सवात संगीतकार श्रीधर फडके यांच्यासमवेत अभिनेते संजय मोने, तुषार दळवी आणि इतर कलाकार सहभागी होणार आहेत. महोत्सवात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता गोविंदनगर येथील त्रिवेणीनगरीत कार्यक्रम होईल. रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलावंतांना समर्पित असा हा यंदाचा महोत्सवही रसिकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास संस्थेचे प्रमुख नंदन दीक्षित यांनी व्यक्त केला.

महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते होईल. यानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. त्यात सुधीर फडके, गदिमा आणि पुलंवर आधारित लेख, आठवणी, किस्से, रसिकांच्या कायम संग्रही राहतील. श्रीधर फडके, सुधीर गाडगीळ, राजदत्त, सुनीता तारापुरे यांसह अनेक कलाकारांनी या स्मरणिकेसाठी लेखन केले आहे. यानंतर बाबूजी, गदिमा आणि पुलं या तिघांवर आधारित अक्षर त्रिवेणी या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. त्यात अभिनेता संजय मोने, तुषार दळवी, गायक अनिरुद्ध जोशी, नचिकेत लेले, गायिका धनश्री देशपांडे, निवेदिका उत्तरा मोने सहभागी होतील. गाणी, अभिवाचन अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. संगीतकार श्रीधर फडके आणि सहकलाकार गीतरामायणाचे सादरीकरण करतील. विघ्नेश जोशी हे वादन करणार आहेत. विशेष सत्कारामध्ये विलास शिंदे (कृषी), सचिन जोशी (शिक्षण), डॉ. भरत केळकर (आरोग्य) आणि मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (सामाजिक) यांचा समावेश आहे.

आठवणी, किस्से, गप्पाष्टक

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संस्कृती वैभव पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना राजदत्त यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बाबूजी, गदिमा, पुलं यांच्या आठवणी आणि किस्से तसेच त्यांच्या अजरामर कलांविषयी गप्पा होतील. पुलंच्या नाटकातील लोकप्रिय संवादिनी वादनाने महोत्सवाचा समारोप होईल.