लोकसत्ता वृत्तविभाग
International Day of Yoga 2023 : नांदगाव: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येथील योग शिक्षक बाळू मोकळ यांनी तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह अर्धातास ५१ योगासनांची प्रात्यक्षिके कडुनिंबाच्या झाडावर केली.
प्राणवायू देणारे झाड असल्याने झाडावरच योगा केल्यास थकवा येणार नाही आणि आसन चांगले करता येऊ शकेल, म्हणून झाडाची निवड केल्याचे मोकळ यांनी सांगितले. पद्मासन, बंध पद्मासन, सर्वांगासन, हलासन, वक्रासन, अर्ध मतसेंद्रासन, भूनमणासान, त्रिकोणासन, विरासन, वृक्षासन, ताडासान, पवनमुक्त आसन, चक्रासन आदी ५१ योगासनांसह ११ सूर्यनमस्कारही मोकळ यांनी घातले. यापूर्वी दुचाकीवर मोकळ यांनी ५१ योगासने केली होती. या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा… नाशिक: मीटर वाचनाशिवाय अनेकांना सरासरी वीज देयके; अस्पष्ट नोंदींमुळे वाढीव भार
मागील १८ वर्षांपासून ते योग शिक्षण देण्याचे काम करत आहेत. योग शिक्षक असलेले मोकळ सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत. आतापर्यंत त्यांनी शाळा, महाविद्यालय, संस्था आदी ठिकाणी १५० हून अधिक योग कार्यशाळा घेतल्या आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी योग प्रशिक्षण सुरू केले आहे. तीन वेळा राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.