बंजारा समाजाची पारंपरिक ‘होळी’ साजरी
बंजारा गीतांना मिळणाऱ्या डफाच्या साथीने चौफेर ठेका धरीत खुंटा उपटण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजातील पुरुषांना (गेर) यथेच्छ लाकडी दंडुक्यांनी हाताखालून काढत गेरनींनी (महिलांनी) तालुक्यातील पोही येथे आगळी होळी साजरी केली. तालुक्यातील बंजारा समाजाचा ‘तांडा’ असलेल्या न्यायडोंगरी, कसाबखेडा, कासारी, पोही, मूळडोंगरी, लोहशिंगवे आदी गावांमध्येही अशा पद्धतीची होळी साजरी करण्यात आली.
समाजातील नात्याने दीर-भावजयी यांच्यात होळी सण साजरा करतांनाचा उत्साह काही न्याराच असतो. चेष्टेचे नाते असलेल्या समाजातील पुरुषांना दंडुक्याचा मार खात ठोकलेला खुंटा उपसण्याचं तगडं आव्हान या महिलांनी (गेरनी) दिलेले असते. हे आव्हान पेलवतांना पुरुषांची धांदल उडते. होळी सणात ‘धुंड’ हा खेळ खेळतांना संस्कृतीचे जतन आमच्याकडून केले जात असल्याचे काळूमामा राठोड यांनी सांगितले. बंजारा समाजात होळीची तयारी दांडी पौर्णिमेपासून सुरू होते. तांडय़ावरील प्रमुख असलेल्या नायकाची परवानगी घेऊन होळी सणाला सुरुवात केली जाते. तांडय़ावरील सर्व समाज बांधव नायकाच्या घरी जाऊन होळी खेळण्याची परवानगी मागतात. ज्यांच्या घरात नुकताच मुलगा जन्माला आला आहे. त्यांच्या घरासमोर होळीनिमित्ताने ‘धुंड’ हा खेळ खेळला जातो.
पोही येथील वाल्मिक राठोड यांच्या घरासमोर तांडय़ावरील बंजारा समाजाने एकत्र जमून धुंड या खेळाला सुरुवात केली. बाळाला खाली बसवून बंजारा गीते म्हणण्यात आली.
बाळाचे नामकरण झाल्यानंतर ‘खुंटा उपटणे’ या खेळाला सुरुवात झाली. खेळ सुरू झाल्यानंतर दोन खुंटे जमिनीत गाडण्यात आले. हे खुंटे उपटण्याचे काम समाजातील पुरुष ( गेर ) मंडळींकडे देण्यात आले. जेव्हा पुरुष मंडळी खुंटा उपटण्यासाठी पुढे येत, तेव्हा महिला (गेरनी) आपल्या हातातील काठय़ांनी पुरुषांना यथेच्छ चोप देत. पुरुष मंडळी विरोध झुगारून दंडुक्याचा मार खात पुन्हा खुंटा उपटण्यासाठी प्रयत्न करीत. खुंटे उपटल्यानंतर खेळाचा समारोप झाला.
तत्पूर्वी महिलांकडूनही ‘गुंजा ‘ (गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पदार्था) हिसकावण्याचा प्रयत्न पुरुषांकडून झाला. त्यावेळी इतर महिलांकडून या पुरुषांना लाकडी दंडुक्याने चोप देण्यात आला. संपूर्ण गाव ‘धुंड’ हा खेळ बघण्यासाठी तेथे उपस्थित होते.