धुळे – कांदा उत्पादक शेतकर्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी शासनाने नाफेड व पणन केंद्र सुरु करावे, अशी मागणी करत धुळे जिल्हा भारत राष्ट्र समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.या आंदोलनात समितीचे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील, ॲड.अशोक पाटील, अविनाश पवार, लोटन पाटील, प्रमोद पाटील, प्रितीसागर पगारे, शाहरूख पटवे, दत्तात्रय पाटील आदी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या अहवालानुसार गेल्या ११ वर्षात महाराष्ट्रात ६० हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सद्य परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहे. यात कांदा उत्पादक शेतकर्यास हमीभाव न मिळाल्याने तो पुरता भरडला गेला आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून शेतकर्यांकडे शेतमाल पडून आहे. त्यांच्याकडे पैसे संपलेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी शासनाच्या योजनेनुसार नाफेड व पणन केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader