त्र्यंबकेश्वरमध्ये काळे झेंडे फडकावून निषेध; स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
स्वराज्य महिला संघटनेनंतर शुक्रवारी पहाटे तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या चौघींनी पोलीस बंदोबस्तात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. स्थानिकांनी दोन दिवसातील घडामोडींच्या निषेधार्थ घरांवर काळे झेंडे लावले. महिलांच्या मंदिर प्रवेशावरून झालेल्या वादात स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी विश्वस्तांनी केली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस बंदोबस्त तसेच महिला सुरक्षारक्षकांच्या वेढय़ात मंदिराने दिलेल्या अटीशर्तीनुसार साडी परिधान करत गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतले. लागोपाठ दोन दिवसांच्या घडामोडींमुळे ग्रामस्थांचा पारा अधिकच वाढला. या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी घरांवर काळे झेंडे लावण्यात आले. स्थानिक महिला पहाटे पाचपासून दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना देसाई यांना देवस्थान तसेच पोलीस प्रशासनाकडून विशेष वागणूक दिली गेल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. रोज उठून कोणीतरी दर्शनासाठी वाद घालत असून केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप असल्याची टीका स्थानिक महिलांनी केली. विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी यांनी त्र्यंबकेश्वर प्रश्नी आंदोलनकर्त्यां महिलांनी स्थानिकांच्या भावना समजून घेणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
विचारांच्या आदानप्रदानातून काही तोडगा निघू शकला असता. एवढा आटापिटा, यंत्रणा कामाला लावत अट्टहासाने जे दर्शन घेतले गेले, त्यामुळे अट्टहास दर्शनाचा होता की जिंकण्याचा असा प्रश्न पडतो. तसेच, ज्या मुद्दय़ांवरून स्थानिकांवर गुन्हे दाखल केले ते मंदिर प्रवेशानंतर मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी
केली.
भूमाता ब्रिगेडचाही गाभाऱ्यात प्रवेश
त्र्यंबकेश्वरमध्ये काळे झेंडे फडकावून निषेध; स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2016 at 01:44 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumata brigade trimbakeshwar temple