जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोघे चालक राष्ट्रीय महामार्गावर कोसळले. त्याचवेळी एका दुचाकीस्वार तरुणाला भरधाव मोटारीची धडक बसल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक नन्नवरे (२०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नन्नवरे हा मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी सायंकाळी नन्नवरे हा जळगावातील खासगी काम आटोपून त्याचा मित्र ललित गोकुळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावकडून बांभोरी येथे दुचाकीने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलाजवळील जकात नक्यासमोरून जात असताना समोरून येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दीपक नन्नवरे हा महामार्गावर मध्यभागी कोसळला. त्याचवेळी बांभोरीकडून जळगावकडे जाणार्‍या अज्ञात मोटारीने दीपक नन्नवरेला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेला ललित पाटील गंभीर जखमी झाला. अपघात घडताच अज्ञात वाहनासह चालकाने पलायन केले.

हेही वाचा – नाशिकमध्ये स्वराधिराज संगीत महोत्सव, डाॅ. आशिष रानडे यांचे गायन

हेही वाचा – रुग्ण अजूनही दरपत्रक, मदतवाहिनीच्या प्रतिक्षेत; नाशिक मनपा आरोग्य विभागाची उदासीनता

याबाबतची माहिती मिळताच बांभोरी येथील ग्रामस्थांसह मित्रपरिवाराने अपघातस्थळी धाव घेतली. जखमी ललित पाटील याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णाललयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रुग्णालयात नातेवाइकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. मृत दीपक नन्नवरेच्या मागे आई सरला, वडील सुरेश श्यामराव नन्नवरे, मोठा भाऊ राकेश व लखन असा परिवार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider dies after being hit by a vehicle in jalgaon ssb
Show comments