लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: वाहतुकीचे नियम जणू आपल्यासाठी नाहीच, अशा अविर्भावात वावरणाऱ्या तसेच क्षमतेहून अधिक म्हणजे तिघांना घेऊन दुचाकी दामटणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून राबविलेल्या विशेष मोहिमेत ६०३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी तिघांना घेऊन (ट्रीपल सीट) दुचाकी चालविणाऱ्या आणि हेल्मेट परिधान न केलेल्या २७६ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

महाविद्यालये सुरू होत असताना शहरात वाहने दामटणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही काही महाविद्यालयीन युवक, युवती दुचाकीवर जितक्या जणांना बसवता येईल, तितक्यांना घेऊन खुलेआम प्रवास करतात. क्षमतेहून अधिक प्रवाश्यांची वाहतूक धोकादायक ठरते. मात्र नियमांकडे कानाडोळा केला जातो. हेल्मेट बाबतही वेगळी स्थिती नाही. वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी मागील काही वर्षांपासून पोलीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. दरवर्षी अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनधारकांचे मृत्यू होतात. त्यामध्ये हेल्मेट परिधान न करणाऱ्यांचा अधिक्याने समावेश असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी पोलिसांनी अनेक मोहिमा राबविल्या. तथापि, आजही निम्मे वाहनधारक हेल्मेटविना प्रवास करताना दिसतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारे, दुचाकीवर तिघांना घेऊन प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेने पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके कारवाईसाठी नियुक्त केली आहेत.

आणखी वाचा-नाशिक: सवलत योजनेमुळे महापालिकेला धनलाभ

या पथकांनी दोन तास वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली. त्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणारे वाहनधारक, तिघांना घेऊन प्रवास करणारे आणि हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पुढील काळात कारवाई सुरू राहणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.

दीड लाखाचा दंड

शहरात वेगवेगळ्या भागात केलेल्या नाकाबंदीत एकूण ६०३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात परिमंडळ एकमध्ये १२० तर परिमंडळ दोनमध्ये १५६ याप्रमाणे एकूण २७६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून एक लाख ४४ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत १५ पोलीस अधिकारी व ६८ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.