पाण्याची उपलब्धता वाढली; गुरुवारी पक्षी गणना
नाशिक : पाण्याचे आवर्तन सोडल्याने निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरातील धरण काठोकाठ भरले असून दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढत असतांना शेतीकामांनीही वेग घेतला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे अभयारण्य परिसरातील पक्ष्यांचा मुक्काम वाढला असून पुढील महिनाभर ही मंडळी येथेच ठाण मांडतील, असा विश्वास पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पक्षीप्रेमींकडून गणना होणार आहे.
नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात देश-विदेशातील पक्षी थंडीच्या काळात मुक्कामास येतात. उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होताच पक्षी आपला मुक्काम हलवितात. यंदा जिल्ह्य़ात दुष्काळाचे सावट असले तरी काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. नुकतेच आवर्तनामुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात पाणी आल्याने धरण काठोकाठ भरले आहे. यामुळे पाण्यात शेवाळ निर्माण होत आहे. गवताळ पक्ष्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होत आहे. पाणी येत असल्याने धरण तसेच नदीलगत असलेल्या गावांमध्ये गहू तसेच उसाच्या शेतात शेतीविषयक कामांनी वेग घेतला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने साप, उंदीर, बेडूक हे बाहेर पडत असल्याने शिकारी पक्ष्यांना आपली शिकार सहज साध्य होत आहे.
याचा एकंदरीत परिणाम म्हणजे धरण परिसरातील पक्ष्यांचा मुक्काम लांबणीवर पडला असल्याचे पक्षीमित्र प्रा. आनंद बोरा यांनी सांगितले. फ्लेमिंगो, रोहित, कौंच, रंगीत करकोचा, गप्पीदास, मोनिया आदी पक्षी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर आहेत. याशिवाय शिकारी गटात गरुडाचे तीन ते चार प्रकार या ठिकाणी दिसत आहेत.
रंगीत करकोच्याने बाभुळाच्या झाडावर घरटी बांधत मुक्काम करण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी या संदर्भात पक्षी गणना होणार असल्याचे बोरा यांनी सांगितले.
त्या घटनेनंतर अभयारण्य परिसरात शांतता
जानेवारी महिन्यात नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात मासेमारीच्या जाळ्यात अडकल्याने १८ पेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा वनसंरक्षकांना जाब विचारत आंदोलन करण्यात आले. या घटनेनंतर धरण परिसरात जा-ये करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. वन विभागाकडून तिन्ही सत्रात गस्त घालण्यात येत आहे. कारवाईत साहित्य जप्त होत असल्याची भीती परिसरातील नागरिकांमध्ये आहे. यामुळे धरणाच्या आतल्या बाजूला कोणालाही जाता येत नसल्याने पक्ष्यांचा मुक्काम वाढला असून मासेमारी आणि अन्य पक्ष्यांची शिकार यावर र्निबध आले आहेत.