जळगाव – वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवारीद्वारे केक कापून जल्लोष करणार्‍या तरुणाईला चोपडा येथील पोलिसांनी कारवाई करीत पोलीस कोठडीची हवा दाखविली. या कारवाईने चोपड्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा शहरातील मास्टर कॉलनी भागात सार्वजनिक जागेत सय्यद फैजलअली मझहरअली (रा. शेतपुरा), शाकीर सय्यद साबीरअली (रा मास्टर कॉलनी), दानिश सय्यद साबीरअली (रा. मास्टर कॉलनी), रिजवानअली अयाजअली (रा. शेतपुरा), दानिश शेख हमीद शेख (रा. मास्टर कॉलनी), बाबू लोहार, निजाम लोहार (रा. के. जी. एन. कॉलनी), साजीद शेख गफ्फार (रा. चुनारअली, जबरे राममंदिराजवळ), शोएब शाह जाकीर शाह (रा. फकीरवाडा) हे विनापरवाना धारदार लोखंडी तलवार, तसेच चाकूचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी वापर करताना मिळून आले.

Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Baba Siddique murder Accused Arrested
Baba Siddique Murder : मुंबई पोलिसांची दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या जागेवरून राजकारण तापले; रवी राणांवर भाजपामधूनच टीका

तरुणाच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दोन हजार रुपये किमतीची तलवार शोएब शाह जाकीर शाह (रा. फकीरवाडा) याच्या घरात आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली. हवालदार नीलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा येथील शहर पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्‍यांच्या मनाई आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. त्यातील सात संशयितांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील, संदीप भोई तपास करीत आहे.