नाशिक – भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना तब्बल एक लाखहून अधिकच्या फरकाने पराभूत करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे ‘जायंट किलर’ ठरले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यातील दिंडोरी, कळवण, निफाड व येवला या चारही मतदारसंघात भगरेंना मताधिक्य मिळाले. तर भाजपच्या ताब्यातील चांदवड आणि शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातील नांदगाव या दोन मतदारसंघात महायुतीच्या डॉ. पवार आघाडीवर राहिल्या. निकालाने राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांच्या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिंडोरी लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. यात चार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असून उर्वरित चांदवडमध्ये भाजप व नांदगाव शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक फारशी अवघड मानली जात नसताना मतपेटीतून धक्कादायक निकाल समोर आले. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे कमी-अधिक फरकाने आघाडीवर राहिले. २६ फेऱ्यांमध्ये भाजपच्या डॉ. भारती पवारांना चांदवड व नांदगाव वगळता कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळू शकली नाही. भगरे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या बाबू भगरे नामक उमेदवाराने तुतारी चिन्हावर बरीच मते खेचली. त्यामुळे मताधिक्य कमी झाले असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजयरथ रोखला गेला नाही.

Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
bjp delhi marathi news
दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Rahul Gandhi
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार?

Dindori Lok Sabha Election Results : तिसरी पास बाबू भगरेंनी दिंडोरीत खऱ्या शिक्षकाच्या मताधिक्याला सुरुंग कसा लावला?

भास्कर भगरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात (९३५००), नितीन पवार यांच्या कळवण (१लाख १४ हजार १३४), दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघात (८९५५४) आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक (१३८१८९) मते मिळाली. दिंडोरी हा भगरेंचा मूळ तालुका आहे. या चारही ठिकाणी मिळालेले मताधिक्य अजित पवार गटाच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरले आहे. भारती पवार यांना भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या चांदवड विधानसभा मतदारसंघात (९५३२५) आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगावमधून (१०३००१) मते मिळाली. या दोन्ही मतदारसंघात भगरे अनुक्रमे (७८५७८) व (६१३३६) मते मिळवत पिछाडीवर राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

डॉ. भारती पवार एक लाखहून अधिक मतांनी पराभूत

भास्कर भगरेंना पाच लाख ७७ हजार ३३९ मते मिळाली तर, डॉ. भारती पवारांना चार लाख ६४ हजार १४० मते मिळाली. १० उमेदवार रिंगणात होते. यात भगरे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) यांना एक लाख तीन हजार ६३२ मते मिळाली. वंचितच्या मालती थविल-डोमसेंना ३७ हजार १०३ तर नोटाला ८२४६ मते मिळाली. विजयी झाल्यानंतर भास्कर भगरे यांनी जनतेने भाजपला पराभूत करीत चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या तिसरी उत्तीर्ण व्यक्तीला उभे करून मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीतील नेत्यांंनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार केल्याने हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader