जळगाव – राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक भाजपा-शिवसेनेने एकत्रित लढविण्याचे ठरविले असले तरी पाचोरा-भडगाव बाजार समितीत भाजपा स्वबळावरच लढणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपातर्फे बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणुकीत भाजपासोबत काही समविचारी उमेदवार निवडणूक लढत आहेत. ही निवडणूक भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समितीचे माजी सभापती सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असून, उमेदवारांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी स्वतंत्र संपर्कही सुरू केला आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sale of stake in Hindustan Zinc by Government
हिंदुस्थान झिंकमधील अडीच टक्के हिश्शाची अखेर सरकारकडून विक्री; गुंतवणूकदारांना १० टक्के सवलतीत ५०५ रुपयांना समभागांसाठी बोली शक्य

हेही वाचा – दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, राहुल गांधींशी तुलना करत म्हणाले, “छोटे युवराज…”

आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी आमदारांनी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अफवांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी बळी पडू नये, तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ असून, निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागले आहेत, असे तालुकाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे २३ एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोरा येथे कार्यक्रमांच्या नियोजनासाठी उद्या जिल्हास्तरीय बैठक

आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार दुसऱ्या पक्षांचे प्रवक्तेपद बळजबरीने उसने भाड्याने घेतल्यासारखे पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत. त्यांची स्वबळावर निवडणुका लढविण्याची ताकद पूर्णपणे खचली असल्याने आमदारांना व त्यांच्या उर्वरित उमेदवारांना कुठलाही आत्मविश्वास उरलेला दिसत नाही, असा टोलाही तालुकाध्यक्ष शिंदे यांनी लगावला आहे.