Nashik District Vidhan sabha results नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निकालातून शहरात भाजप तर, ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे दोन जागा राहिल्या. देवळालीत अधिकृत बंडखोरी करून जागा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक शहरात १५ वर्षांपासून असणारे भाजपचे एकहाती वर्चस्व कायम राखण्यात पक्षाला यश मिळाले. त्याआधी मनसेला केवळ एकदाच असे वर्चस्व राखणे शक्य झाले होते. सलग तीन निवडणुकीत नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व हे तीन मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात भाजपला यश मिळाले. इतकेच नव्हे तर गतवेळच्या तुलनेत अधिक मताधिक्यांनी भाजप विजयी झाले. शहरावरील हे वर्चस्व पक्षाला महापालिका निवडणुकीत कामी येणार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटासह महाविकास आघाडीची निर्माण झालेली सद्दी विधानसभेत मोडून काढली. ग्रामीणमधील वाट्याला आलेल्या सर्वच्या सर्व सात जागा त्यांनी मिळवल्या.

हेही वाचा… नाशिकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचे असेही विक्रम….

यात येवला, सिन्नर, निफाड, कळवण, दिंडोरी, देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघाचा समावेश आहे. देवळाली मतदारसंघातील काही शहरी भाग वगळता हे सर्व मतदारसंघ ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागावर अजित पवार गटाने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपला ग्रामीणमधील चांदवड व बागलाण या दोन मतदारसंघात विजय मिळाला. शिवसेना शिंदे गटाला मालेगाव बाह्य व नांदगाव या पूर्वीच्या जागा राखण्यावर समाधान मानावे लागले. देवळाली मतदारसंघात राजश्री अहिरराव यांना अधिकृत उमेदवारी देत शिंदे गटाने संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे नाशिक शहरात भाजप तर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट दादा राहिले.