ओबीसींच्या मतांसाठी भाजपा सरकारने ७०० कोटींचा निधी जाहीर केला. आता घरी बसण्याची तुमची वेळ आली आहे. मग ७०० कोटी रुपये देणार कुठून असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी सिन्नर येथील जाहीर सभेत केला. या सरकारची राज्य करण्याचीही लायकी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसींचे आरक्षण दिले आहे असे सांगतानाच आज ओबीसींचे १७ टक्के आरक्षण राहिले आहे. तर ९ टक्केच नोकर्‍यांमध्ये आरक्षण भरलेले आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.

सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे. यांना साडेचार वर्षांत सुचले नाही. परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.

जे परिवर्तन होणार आहे, ते सत्तेचे होणार नसून तुम्हा आम्हाला जे दु:ख आहे, अडचणी आहेत त्याबाबतचे परिवर्तन होणार आहे. राज्य करण्याची यांची लायकी नाही. यांची लवकरच घर वापसी करा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात आजपासून (बुधवार) नाशिक जिल्ह्यातून झाली.