राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य हे समाज गढूळ करणारे आहे, अशी टीका भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला असून सोमवारी येथे भाजपच्यावतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार यांचे विधान समाज मने दुषित करण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री उर्फी जावेदने केलेल्या पेहरावावरही त्यांनी टीका केली. उघड्या नागड्या फिरणाऱ्या अशा मुली महाराष्ट्रात चालणार नाही. ही बाई ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.