नाशिक – तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करून अशोभनीय वर्तन केले. याप्रसंगी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भ्रमणध्वनीत चित्रण केले. याच्या निषेधार्थ भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांचा निषेध करून आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काशिनाथ शिलेदार, सुनील केदार, ॲड. शाम बडोदे, वसंत उशीर, अमित घुगे, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर, पवन भगूरकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा – काळ्या बाजारात विक्रीपूर्वीच रेशनचा तांदूळ हस्तगत, जळगाव जिल्ह्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – नाशिक : आवर्तनावेळी कालव्यांलगतचे रोहित्र बंद, शंभरहून अधिक गावांना अल्पवेळ वीज पुरवठा, पाणी चोरी रोखण्यासाठी उपाय

भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या पायऱ्यांवर बॅनर्जी यांनी धनखड यांची नक्कल करुन अशोभनीय वर्तन केल्याचा आक्षेप आंदोलकांनी नोंदविला. राहुल गांधी यांनी या सर्व प्रकाराचे भ्रमणध्वनीत चित्रण केले. बॅनर्जी आणि गांधी यांचा निषेध करून भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या पुतळ्याला जोडे मारून निदर्शने केली.