नाशिक – नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) च्या वतीने आयोजित ” होमेथॉन २०२२” या मालमत्ता प्रदर्शनात नाशिकसह अन्य भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. चार दिवसीय प्रदर्शनात सुमारे ६० हजार नागरिकांनी भेट दिली. शेकडो नागरिकांनी गृह स्वप्नांची पूर्तता केली. या काळात ३०० हून अधिक सदनिका व दुकानांची नोंदणी झाली असून यामध्ये पुढील काळात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. या माध्यमातून शेकडो कोटींची उलाढाल होणार आहे. प्रदर्शनास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील मेट्रो निओ प्रकल्प, माहिती तंत्रज्ञान केंद्र (आयटी हब) यासह अन्य प्रलंबित प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे नमूद केले.

हेही वाचा >>> जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीतील कथित पैसे वाटपावरुन भालोद सोसायटी संचालकांमध्ये वाद

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

स्मार्ट शहराकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीबरोबर गृहस्वप्नांची पूर्तता करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित होमेथॉन गृह प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. देवयानी फरांदे यांनी प्रदर्शनास भेट दिली. अखेरच्या दिवशी प्रदर्शनात प्रचंड गर्दी उसळली होती. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांनी सकाळपासून सहकुटुंब गर्दी केली. विविध भागातील सदनिका, दुकाने व भुखंडांची माहिती घेतली. प्रदर्शनातील सवलतींचा लाभ घेऊन अनेकांनी घराची नोंदणी केली. अनेकांनी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट देऊन नोंदणीचे निश्चित केले. प्रदर्शनात एकाच छताखाली सदनिका, दुकाने व कार्यालयांचे असंख्य पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे अल्प व मध्यम उत्पन्न घटकापासून ते अतिशय प्रशस्त व आरामदायी घर खरेदीची मनिषा बाळगणाऱ्या अशा सर्वांसाठी विविध पर्याय होते. प्रदर्शनात अगदी १५ लाखांपासून ते चार, पाच कोटीपर्यंतची घरे खरेदीची ग्राहकांना मिळाली. रविवारी सायंकाळपर्यंत ३०० हून अधिक ग्राहकांनी घर, दुकानांची नोंदणी केल्याची माहिती नरेडकोचे नाशिक अध्यक्ष अभय तातेड आणि सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा >>> नाशिक : युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी

कोणत्याही दालनात मालमत्तेची नोंदणी करणाऱ्यास नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात आले. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यांपैकी भाग्यवंताला सोडतीव्दारे चांदीचे नाणे दररोज दिले गेले. समारोप सोहळ्यास नरेडकोचे सचिव सुनील गवादे, समन्वयक जयेश ठक्कर, होमेथॉनचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे आदी उपस्थित होते. अनेकांनी सदनिका, दुकानांची माहिती घेतली. प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन नोंदणीचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवरील नोंदणी आणि पुढील काळात प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारी नोंदणी याद्वारे शेकडो कोटींची उलाढाल होणार असल्याचे अधोरेखीत झाले.

केंद्राकडून नाशिककरांना भेट मिळणार- बावनकुळे

केंद्र सरकारकडून नाशिककरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. नाशिककरांच्या विविध मागण्या राज्य शासनाकडून केंद्राकडे पोहचवल्या गेल्या आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी मेट्रो निओ प्रकल्पाचा मार्ग लवकरच प्रशस्त होईल. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्नही लवकर सुटणार आहे. प्रलंबित माहिती तंत्रज्ञान केंद्र (आयटी हब) आणि अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील इतर भागातून नागरिक नाशिकमध्ये दुसरे घर खरेदी करीत आहेत. त्यामुळे नाशिकचा अन्य शहरांशी हवाई संपर्क वाढविण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी चर्चा केलेली आहे. पुढील काळात काही कंपन्यामार्फत नाशिकमधून विमान सेवा सुरू केली जाईल. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.