धुळे: शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकाऱ्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे शिरपूर तालुक्यातील वरूळ येथे शेतजमीन आहे. ती तक्रारदार व त्यांची बहीण यांच्यात वाटणी करून देण्याबाबत शिरपूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून तक्रारदाराने आदेशाची प्रत जोडून शिरपूर तहसीलदार यांच्याकडे शेतजमीन नावे करून देण्यासंबंधी ३० ऑगस्टला अर्ज जमा केला होता. त्यावरून तहसीलदारांनी पुढील कार्यवाहीसाठी सदरचा अर्ज १२ सप्टेंबरला तलाठी वरूळ यांच्याकडे पाठविला.

हेही वाचा… तूर, कापूस पिकाआड गांजाची शेती; शिरपूर तालुक्यात तीन कोटींची झाडे जप्त; पोलीस पथकास बक्षीस

तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कार्यवाही करून शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावे लावली. त्यानंतर जवखेडा भागाचे मंडळ अधिकारी मुकेश भावसार याने नाव लावण्याचे काम करुन दिले म्हणून दोन हजार रुपयाची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भावसारला दोन हजारांची लाच स्वीकारताना पकडले. भावसारविरुध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board officer in shirpur taluka dhule was arrested for accepting a bribe of two thousand rupees dvr