दीपक महाले, लोकसत्ता

जळगाव : सर्वदूर ख्याती असलेल्या आणि अतिशय गोड व रुचकर असलेली जळगाव जिल्ह्यातील मेहरुणची बोरे यंदा कमी पर्जन्यमानामुळे डिसेंबर उलटला तरी पुरेशा प्रमाणात बाजारात दाखल झालेली नाहीत. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसर्या-तिसर्या आठवड्यात येणार्या या बोरांची यंदा खवय्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मेहरुणसह शहरालगत परिसरातील गावांमध्येही बोरांचे उत्पादन घेतले जात आहे. सध्या बाजार समितीत रोज केवळ दोन-अडीच टन आवक होत आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज

खानदेशची मेहरुणची बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. मागणीही खूप असते. त्यामुळेच त्यांचे दर सुरुवातीपासून अखेरपर्यंत टिकून राहतात. वेचणी, मजुरी, वाहतुकीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना फारसा खर्च या पिकासाठी येत नाही. त्यामुळे आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे कोरडवाहू पीक म्हणून मेहरुणच्या बोरांकडे पाहिले जाते. ही बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची असतात. जळगाव शहरानजीकच्या मेहरुण शिवारात मेहरुण बोरांची शेती पूर्वी केली जायची. हा भाग जळगाव शहरात समाविष्ट झाल्यावर तिथली शेती कमी होत गेली. आता मेहरुण भागातील २० ते ३० शेतकर्यांकडेच मेहरुण वाणाची झाडे शिल्लक असून, तालुक्यातील विविध भागांत म्हणजे म्हसावद, बोरनार, जळगाव खुर्द, बेळी, कानळदा, नांद्रा, आव्हाणे, खेडी खुर्द व वडनगरी आदी गावांतील शेतांच्या बांधावरही मेहुरुणची झाडे दिसून येतात.

आणखी वाचा-गोदापात्र दुषित करणाऱ्यांनो सावधान…; नाशिक पोलीस-मनपा संयुक्त पथकाकडून आता कारवाई

दिवाळीनंतर बोरांची आवक सुरू होते. यंदा डिसेंबर संपला तरी आवक फारशी नाही. काही शेतकरी स्वतः रोज २० ते ३० किलो बोरे घेऊन जळगाव शहरासह उपनगरांत, महामार्गावर, रस्त्यांवर विक्री करतात. त्यास प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दर मिळत आहे. जळगावकर नातेवाइकांना पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे आदी भागात पाठविण्यासाठी ही बोरे घेतात. त्यामुळेच बाजार समिती किंवा किरकोळ बाजारात बोरांना चांगला उठाव आहे आणि दरही टिकून आहेत. वाळविलेल्या बोरांना प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजारांपर्यंत दर मिळतो.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका जाळ्यात

कोरडवाहू, आश्वासक बोरे पीक

गोला, सफेदा, सेब, कैथली, सन्नूर क्रमांक पाच, छुहारा, कडाका, उमरान आणि मेहरुण या बोरांच्या जाती आहेत. दिवाळीनंतर बोरांचा हंगाम सुरू होऊन तो मकरसंक्रांतीपर्यंत सुरू असतो. कोरडवाहू पीक म्हणून मेहरुण बोरांकडे पाहिले जाते. २०२२ मध्ये १५ ते २० दिवसांत प्रतिदिन सरासरी आवक १२ क्विंटल झाली होती. त्यावेळी बाजार समितीत प्रतिकिलो १२ ते २० रुपये दर होता.

सध्या जळगाव बाजार समितीत रोज एक मालवाहू मोटारभर अर्थात दोन ते अडीच टन मेहरुण बोरांची आवक होत आहे. या बोरांना प्रतिकिलो १५-२० रुपये घाऊकमध्ये, तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८०-१०० रुपयांपर्यंत भाव आहे. बोरांना राज्यातील विविध जिल्ह्यांतून मागणी आहे. -कुणाल चौधरी (व्यापारी, बाजार समिती, जळगाव)