लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : रविवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात गणपती विसर्जन करताना अचानक पाण्याने भरलेल्या चारीचा कडा तुटल्याने १५ वर्षाच्या मुलाचा कोसळल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. हर्षल हनुमंत पाटील (वय १५, रा.हनुमानखेडा ता.पारोळा जि.जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

रविवारी गणेशोत्सवाचा नववा दिवस होता. या दिवशी अनेक घरगुती गणेशांचे विसर्जन करण्यात आले. हर्षल पाटील १५, रा. हनुमानखेडा, ता. पारोळा, जि. जळगाव) हा आपल्या नातेवाईकांबरोबर गणपती विसर्जनासाठी गेला होता. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या तळ्यात ते गणपती विसर्जन करत होते. यावेळी तळ्याच्या काठावर असताना अचानक चारीचा कडा तुटला. यामुळे हर्षल हा पाण्यात कोसळला. त्याला वाचविण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी तसेच नातेवाईकांनी देखील पाण्यात उडी घेतली. परंतु, हर्षल आढळून आला नाही. काही वेळाने तो सापडला.

आणखी वाचा- कांदा उत्पादकांचा राग शमविण्याचा प्रयत्न, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी निर्णय

नागरिकांच्या मदतीने त्यास जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. याबाबत आष्टे येथील श्रीराम पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार विनायक सोनवणे करीत आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात हर्षलच्या मृतदेहाचे विच्छेदन करुन सायंकाळी उशिरा मृतदेह हनुमानखेडा या मूळ गावी नेण्यात आला. हर्षल हा शिक्षणासाठी आत्याकडे आला होता.