त्र्यंबकेश्वर तालुक्यात व घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हट्टीपाडा येथे रविवारी रात्री जागेच्या वादावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत आठ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर सोमवारी गावातील परिस्थिती शांत होती.
भास्कर सदगीर यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश ढोन्नर, वसंत ढोन्नर, रंगनाथ लाडे यांसह इतरांनी आपणास तू आमच्या जागेतून का गेला, अशी कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे. घरातील सदस्य बाहेर आल्यावर त्यांनाही या टोळक्यांनी मारहाण केली. मारहाणीत मीराबाई सदगीर, गोरख सदगीर, त्र्यंबक सदगीर, एकनाथ सदगीर, संगीता सदगीर, तुकाराम सदगीर आदीं जखमी झाले. जखमींना उपचारार्थ घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा