नंदुरबार : जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक सहावरील ६८ मीटर लांबीचा पूल गुरुवारी सकाळी कोसळला. हा पूल धानोरा आणि ईसाईनगर गावाजवळील रंका नदीवर आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
१९८२ साली सदर पूल बांधण्यात आला होता. सुमारे ४० वर्ष जुना हा पूल होता. राज्य महामार्ग क्रमांक सहा पुढे थेट गुजरातकडे जातो. पूल कोसळल्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक सुंदरदेमार्गे खांडबाऱ्याकडे आणि सूरतहून नंदुरबारकडे येणारी वाहतूक केसरपाडा, निझरमार्गे वळविण्यात आली आहे.
First published on: 29-09-2022 at 12:19 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge collapsed state highway nandurbar district msrtc bus vehicles dhanora isainagar gujarat traffic divert tmb 01